नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंदमध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंदमध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद येथील म्हसोबा मंदिराजवळ पुणे-अहिल्यानगर रोडवर अज्ञात दुचाकीस्वाराच्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळ घडली. अज्ञात दुचाकीस्वाराने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत रस्त्याने पायी जात असलेल्या राधाकिसन मंजीबा घाडगे (वय ६४, रा. काकावाडी, महाराष्ट्र बँकेमागे, लोणीकंद) यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात राधाकिसन घाडगे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांचे पुत्र आंबादास घाडगे (वय ४०, रा. लोणीकंद) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८१/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व ११९/१७७ अन्वये अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. ए. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930