वाजेवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या नवचिर्वाचित सचिव मधुकर कंद यांचे ग्रामस्थांकडून स्वागत
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
वाजेवाडी : वाजेवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवचिर्वाचित सचिवपदी मधुकर कंद यांची नियुक्ती झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी सोसायटीचे माजी सचिव अनिल कुंभार यांनी आपल्या पदाचा कार्यभार मधुकर कंद यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द केला.
अनिल कुंभार यांनी तब्बल २५ वर्षे सोसायटीची प्रामाणिकपणे व जबाबदारीने सेवा बजावली. त्यांच्या कार्यकाळात सोसायटीच्या विकासासाठी केलेल्या योगदानाबद्दल वाजेवाडी विविध कार्यकारी सोसायटी तसेच ग्रामस्थांनी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
नवीन सचिव म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मधुकर कंद यांचे अभिनंदन करण्यात आले. ग्रामस्थांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सोसायटीच्या प्रगतीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली चांगले कार्य घडेल, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी सोसायटीचे पदाधिकारी, सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





