नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , मयुरी लॉन्समध्ये पहिल्यांदाच शुभविवाह ठरलेल्या मुहूर्तावर; वाजे परिवाराने घडवला इतिहास – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

मयुरी लॉन्समध्ये पहिल्यांदाच शुभविवाह ठरलेल्या मुहूर्तावर; वाजे परिवाराने घडवला इतिहास

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वाजेवाडी : शिरूर तालुक्यातील चाकण-शिक्रापूर रोडवरील चौफुला, पिंपळे जगताप येथील मयुरी लॉन्स मंगल कार्यालयात आजपर्यंत एकही विवाहसोहळा निर्धारित मुहूर्तावर पार पडला नव्हता. मात्र वाजेवाडी येथील वाजे परिवाराने नियोजनबद्ध तयारी करत सौरव वाजे आणि आरती शिंदे यांचा शुभविवाह शनिवारी (दि. २७ जून २०२६) सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांच्या निर्धारित मुहूर्तावर यशस्वीरित्या संपन्न करून या मंगल कार्यालयाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला.

या अनोख्या योगायोगाची पाहुण्यांमध्ये मोठी चर्चा रंगली. अनेक मित्रमंडळींनी नवरदेवाचे वडील अनिल तुळशीराम वाजे यांच्यासोबत विवाह वेळेत होणार नाही, अशी शर्तही लावली होती. मात्र त्यांनी सुरुवातीपासूनच विवाह निश्चित वेळेतच लावण्याचा निर्धार व्यक्त केला होता. अखेर त्यांचे नियोजन आणि वेळेचे काटेकोर पालन यामुळे विवाह अगदी ठरलेल्या मुहूर्तावर पार पडला. त्यामुळे उपस्थितांनी वाजे परिवाराचे विशेष कौतुक केले.

वाजेवाडी (ता. शिरूर) येथील सौरव अनिल वाजे हे सुवर्णा व अनिल तुळशीराम वाजे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. त्यांचा विवाह आमराळवाडी (ता. खेड) येथील आरती बबन शिंदे यांच्याशी संपन्न झाला. आरती या वंदना व बबन म्हातारबा शिंदे यांच्या तृतीय कन्या आहेत.

भारतीय संस्कृतीतील विवाह हा दोन व्यक्तींसह दोन कुटुंबांना एकत्र आणणारा पवित्र आणि मांगल्याचा संस्कार मानला जातो. हळद, मेहंदी, मंगलाष्टके आणि वैदिक विधींच्या साक्षीने पार पडलेला हा विवाहसोहळा पारंपरिक वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

समारंभानंतर उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार आणि मान्यवरांनी नवदांपत्याला शुभेच्छा देत वाजे परिवाराच्या वेळेच्या शिस्तीचे व उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले.

सध्या अनेक ठिकाणी विवाह सोहळे नियोजित वेळेपेक्षा उशिरा पार पडत असल्याची तक्रार सातत्याने ऐकायला मिळते. अशा परिस्थितीत वाजे आणि शिंदे परिवारांनी वेळेचे महत्त्व जपत विवाह सोहळा वेळेत पूर्ण करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, प्रत्येकाने या कुटुंबाचा आदर्श घेऊन आपले विवाह सोहळा वेळेत संपन्न करण्याचा प्रयत्न करावा – मुकेश इंगवले,प्रसिद्ध निवेदक

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930