नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , डॉक्टर्स डे निमित्त दिवंगत डॉ. चंद्रकांत कोलते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

डॉक्टर्स डे निमित्त दिवंगत डॉ. चंद्रकांत कोलते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, ता. ५ : आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या निमित्ताने असोसिएटेड डॉक्टर्स ग्रुप व हवेली तालुका डॉक्टर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने, मणिपाल हॉस्पिटलच्या प्रायोजकत्वाखाली बकोरी येथील देवराई वनराई प्रकल्पात रविवारी वृक्षारोपण अभियान उत्साहात पार पडले.

एक डॉक्टर – पाच झाडे’ या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सुमारे ७० डॉक्टरांनी सहभाग घेत १०० वृक्षांची लागवड केली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच डॉक्टरांनी दिवंगत डॉ. चंद्रकांत कोलते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अर्जुन वृक्षाचे रोप लावून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.उपक्रमादरम्यान वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांच्या वतीने सहभागी डॉक्टरांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी डॉ. मच्छिंद्र काशिद म्हणाले, “डॉक्टर्स डेच्या निमित्ताने असोसिएटेड डॉक्टर्स ग्रुप आणि हवेली तालुका डॉक्टर्स ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. आरोग्य तपासणी शिबिरानंतर पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेले हे वृक्षारोपण अभियान हा दुसरा महत्त्वाचा उपक्रम आहे. आज ७० डॉक्टरांनी एकत्र येऊन १०० वृक्षांची लागवड केली. आमचे वंदनीय गुरुवर्य दिवंगत डॉ. चंद्रकांत कोलते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अर्जुन वृक्षाची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी समाजाने पुढाकार घेणे ही काळाची गरज असून, त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी.”

या अभियानासाठी मणिपाल हॉस्पिटलचे प्रायोजकत्व लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व डॉक्टरांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सहभागी सर्व डॉक्टर, सहकार्य करणारे मान्यवर आणि उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्वांचे आयोजकांनी आभार मानले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930