नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा सुखरूप बचाव – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा सुखरूप बचाव

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे भीमा नदीला आलेल्या महापुरात महादेव किसन राऊत (वय ४५, रा. वढू बुद्रुक) हे वाहून गेल्याची घटना घडली. मात्र, प्रशासन, बचाव पथक आणि स्थानिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

पोलीस पाटील जयसिंग भंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार , वढू बुद्रुक येथील भीमा नदीच्या कडेला सणसवाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या ओट्यावर महादेव राऊत हे सोमवारी दुपारच्या सुमारास झोपलेले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीमा नदीची पातळी अचानक वाढली आणि पाण्याच्या टाकीला वेढा घातला. यामुळे महादेव हे पुरात अडकले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफचे पथक, शिरूरचे तहसीलदार, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच महसूल व पोलीस प्रशासन तातडीने दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

या बचाव मोहिमेदरम्यान पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हेमंत कुंजीर, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, पत्रकार शेरखान यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खोल पाण्यात उतरून महादेव राऊत यांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या धाडसी आणि तत्पर प्रयत्नांमुळे अखेर संबंधित व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

बचावकार्य यशस्वी झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मुसळधार पावसामुळे ओढे, नाले आणि नदीपात्रांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी पूरग्रस्त भागात जाणे टाळावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बचाव मोहिमेत सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930