वाजेवाडीत खूप जुने चिंचेचे झाड मुसळधार पावसात उन्मळून पडले
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
वाजेवाडी, दि. ६ : शिरूर तालुक्यातील वाजेवाडी गावातील सुमारे ९० वर्षांपूर्वीचे भव्य व ऐतिहासिक चिंचेचे झाड सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उन्मळून पडले. अनेक दशकांपासून गावाची ओळख बनलेल्या या झाडाच्या पडण्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हे झाड गावकऱ्यांना सावली देण्याबरोबरच अनेक सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे साक्षीदार ठरले होते. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मते, हे झाड जवळपास ८० ते ९० वर्षांपूर्वी लावण्यात आले होते.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जमिनीची धूप झाली आणि झाडाची मुळे कमकुवत झाल्याने अखेर हे विशाल चिंचेचे झाड उन्मळून पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे वित्तहानी झाली नाही.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





