नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , चौफुला–वाजेवाडी–वढू बुद्रुक मार्गावरील रस्ता खचल्याने नागरिकांची गैरसोय  – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

चौफुला–वाजेवाडी–वढू बुद्रुक मार्गावरील रस्ता खचल्याने नागरिकांची गैरसोय 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वाजेवाडी : शिरूर तालुक्यातील चाकण रोड चौफुला, वाजेवाडी ते वढू बुद्रुक दरम्यान पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्गावर मुरमाचा भराव करून वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आल्याने या पर्यायी रस्त्यावरील मुरमाचा भराव वाहून गेला. परिणामी रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून सुरक्षिततेच्या कारणास्तव एसटी बससेवा सलग तिसऱ्या दिवसापासून बंद ठेवण्यात आली आहे.

या मार्गावरील बससेवा बंद झाल्याने शिरूर तालुक्यातील पाबळ, केंदूर, वाजेवाडी, मांजरेवाडी, करंदी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप येथील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आणि दैनंदिन प्रवाशांचे हाल होत असून खासगी वाहनांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, कार व इतर खाजगी वाहने कोरेगाव भीमा–पिंपळे जगताप या पर्यायी मार्गाने शिक्रापूर–चाकण महामार्ग गाठत आहेत. मात्र हा रस्ता अतिशय अरुंद असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेती असल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी गुडघाभर खोल खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

पुलावरील माती व रस्त्याचा भाग खचल्यामुळे संबंधित विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्याची तयारी सुरू आहे. मात्र रस्ता पूर्ववत होईपर्यंत या परिसरातील हजारो नागरिकांना वाहतुकीच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार असल्याने तातडीने दुरुस्ती करून बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930