नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , नीट २०२६ मध्ये अश्विन भोसलेचे घवघवीत यश; ७२० पैकी ५७६ गुणांची उल्लेखनीय कामगिरी – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

नीट २०२६ मध्ये अश्विन भोसलेचे घवघवीत यश; ७२० पैकी ५७६ गुणांची उल्लेखनीय कामगिरी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

शिरूर : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) यांनी जाहीर केलेल्या नीट (यूजी) २०२६ च्या निकालात शिरूर तालुक्यातील आपटी येथील शेतकरी कुटुंबातील अश्विन अशोक भोसले याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अश्विनने ७२० पैकी ५७६ गुण मिळवत स्पर्धात्मक परीक्षेत लक्षणीय कामगिरी केली आहे.

यंदाची नीट (यूजी) परीक्षा २१ जून २०२६ रोजी पार पडली होती. त्याचा निकाल १६ जुलै २०२६ रोजी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून जाहीर करण्यात आला. या निकालानंतर अश्विन भोसले याच्यावर कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अश्विनच्या या उल्लेखनीय यशामुळे आपटीसह संपूर्ण शिरूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

माझ्या या यशाचे सर्व श्रेय माझे आई-वडील, गुरुजन आणि ज्यांनी मला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले त्या सर्वांना जाते. शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, मात्र जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या बळावर हे यश मिळवू शकलो. माझ्यावर विश्वास ठेवून शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊन एक संवेदनशील, कुशल आणि समाजसेवेला वाहिलेला डॉक्टर बनण्याचे माझे स्वप्न आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी आणि त्यांनीही मेहनत, चिकाटी व योग्य नियोजनाच्या बळावर आपले ध्येय गाठाणार असल्याचे
अश्विनने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930