केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मातोश्री रुक्मिणी मोहोळ यांचे आळंदीत माऊलींचे दर्शन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
आळंदी : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मातोश्री श्रीमती रुक्मिणी मोहोळ यांनी श्रीक्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट देत माऊलींचे दर्शन घेतले.यावेळी आळंदी देवस्थानच्या वतीने रुक्मिणी मोहोळ यांचे स्वागत करण्यात आले. श्रींच्या गाभाऱ्यात दर्शन घेतल्यानंतर त्यांना श्रींची प्रतिमा, नारळ व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे (कबीरबुवा), केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या मातोश्री रुक्मिणी मोहोळ, धर्मपत्नी मोनिका मोहोळ, भाजपा आध्यात्मिक आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय घुंडरे, रोहिणी लोंढे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर आदी उपस्थित होते.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





