शिरसवडी गोळीबारातील आरोपींना २४ तासांत अटक; संदीप येळे यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते गौरव
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसवडी येथे व्यावसायिकावर झालेल्या गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास करत आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी संदीप येळे यांचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शिरसवडी येथे व्यावसायिकावर गोळीबार झाल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा शोध घेतला. पोलिसांच्या पथकाने वेगाने तपास करून गुन्ह्यातील आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते संदीप येळे यांचा सन्मान करण्यात आला. गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईचे यावेळी कौतुक करण्यात आले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





