नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या ३२ वर्षीय तरुणास अटक – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या ३२ वर्षीय तरुणास अटक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वार्ताहर, विनायक साबळे 

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सणसवाडी येथे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या ३२ वर्षीय तरुणास अटक केली. धनंजय आकाश धुणगव (वय ३२, रा. आदर्शनगर, सर्व्हे नं. ७२, दत्त कॉलनी, दिघी, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि लाल रंगाची स्विफ्ट कार असा एकूण ४ लाख ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रविवारी (दि.९ ) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना सणसवाडी येथील अंबिका कला केंद्रासमोर, नगर-पुणे रस्त्यावर एक व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन उभी असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला.

यावेळी धनंजय धुणगव याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच तो वापरत असलेली लाल रंगाची स्विफ्ट कारही पोलिसांनी ताब्यात घेतली.या पिस्तूलाचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात येणार होता आणि आरोपीकडे शस्त्र व काडतुसे कोठून आली, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.याप्रकरणी पोलिस हवालदार विकास पाटील यांच्या फिर्यादीवरून धनंजय धुणगव याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलिस फौजदार संजय पड्याळ, पोलिस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील तसेच पोलिस अंमलदार सागर धुमाळ यांनी सहभाग घेतला.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930