लोणीकंद येथे संत सावता माळी महाराजांचा ७३१ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद : संत शिरोमणी श्री सावता माळी महाराज यांच्या ७३१ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लोणीकंद येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात भाविकांनी संत सावता माळी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले.
या धार्मिक सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी उपस्थित राहून संत शिरोमणी श्री सावता माळी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भूमकर, संतोष झुरुंगे, गणेश झुरुंगे, अशोक होले,आदी ग्रामस्थ भाविक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला होता. धार्मिक कार्यक्रमांमुळे लोणीकंदमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





