आळंदीत संत सावता माळी महाराजांचा ७३१ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
आळंदी : येथील श्री संत सावता माळी सेवा मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे संत शिरोमणी सावता माळी महाराज यांचा ७३१ वा संजीवन समाधी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
सोहळ्यानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात हभप शुभम महाराज पोकळे यांचे सावता माळी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित कीर्तन झाले. त्यांच्या सुश्राव्य वाणीतून सादर झालेल्या कीर्तनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री संत सावता माळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या धार्मिक सोहळ्यास समाजबांधव, भगिनी तसेच मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेश गोरे, महेश जाधव, राजेंद्र गोरे, माऊली जाधव, माऊली कोद्रे, मारुती जाधव, किरणशेठ नरके, भरत गोरे, समीर गोरे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी माऊलींचे चोपदार राजाभाऊ रंधवे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, हमीद शेख आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.हरिनामाच्या गजरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आणि याच भक्तिमय वातावरणात संजीवन समाधी सोहळ्याची सांगता झाली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





