नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , खून व मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक; पिस्तूल व दोन जिवंत राऊंड जप्त – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

खून व मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक; पिस्तूल व दोन जिवंत राऊंड जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद :खून व मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जामिनावर सुटलेल्या आरोपींच्या प्रकरणातील फरार साथीदाराला लोणीकंद पोलिसांनी लोणावळा येथून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत राऊंड असा सुमारे ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दिनांक २५ जून २०२६ रोजी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी दरम्यान खून व मोक्का गुन्ह्यातील जामिनावर सुटलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत राऊंड आणि ग्लांझा कार असा एकूण ६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या कारवाईदरम्यान त्यांचा साथीदार ओंकार ऊर्फ लाल्या सुनील इंगवले (वय २३, रा. जातेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) हा पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा शोध सुरू ठेवला.

ओंकार इंगवले हा लोणावळा येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद तपास पथकाने लोणावळा येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. पुढील तपासादरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आले.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कागणे, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त अबिनाश कुमार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930