बापूसाहेब भुजबळ यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद : महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून सेवेत रुजू झालेल्या बापूसाहेब भुजबळ यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट सेवेमुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बापूसाहेब भुजबळ यांनी महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल २८ वर्षे अभिमानास्पद सेवा बजावली आहे. पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असा त्यांचा सेवाप्रवास उल्लेखनीय असून, या काळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी उल्लेखनीय योगदान दिले.
त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि उत्कृष्ट सेवा यामुळे पोलीस दलाचा गौरव वाढला आहे. त्यांच्या पदोन्नतीनिमित्त सहकारी, मित्रपरिवार आणि नागरिकांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील सेवावाटचालीस शुभेच्छा दिल्या.‘सेवा, सुरक्षा, समर्पण, न्याय आणि विश्वास’ या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीदाला साजेशी कामगिरी करत भुजबळ यांनी आपल्या सेवेत नवा आदर्श निर्माण केला आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





