चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक १चे सुयश
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
आळंदी (गौतम पाटोळे) : आळंदी नगरपरिषद शिक्षण विभागाच्या शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांनी सन २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शाळेतील समृद्धी नरवडे हिने २६० गुण, सोहम कुसमडे याने २२६ गुण, तर ज्ञानेश्वर पितळे याने २१८ गुण मिळवत उज्ज्वल कामगिरी केली. या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
विद्यार्थ्यांना शिक्षक महेश नेहरे व जयश्री नेहरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक संतोष मरभळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे पाटील, शिक्षण सभापती खुशी बोरुंदिया, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, प्रशासन अधिकारी सोनाली झिंजुडे, मुख्याध्यापक संतोष मरभळ, शिक्षकवृंद, पालक तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी आळंदी नगरपरिषद शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे,” असे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.
दरम्यान, आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीनेही शाळेच्या या उल्लेखनीय यशाचे कौतुक करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील व कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





