नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंदमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात; विविध ठिकाणी राष्ट्रध्वजास मानवंदना – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंदमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात; विविध ठिकाणी राष्ट्रध्वजास मानवंदना

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद : भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन लोणीकंद (ता. हवेली) परिसरात उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, लोणीकंद पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय तसेच सिद्धार्थनगर व सहकारनगर येथे राष्ट्रध्वज फडकावून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.

लोणीकंद येथील जिल्हा परिषद शाळेत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सदस्या मोनिका कंद व सरपंच सुप्रिया कंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शालेय समितीचे अध्यक्ष विजय कंद व उपाध्यक्ष गोपीनाथ कंद यांच्या हस्ते राष्ट्रध्वजपूजन करण्यात आले.

लोणीकंद पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुप्रिया कंद व उपसरपंच सागर कंद यांच्या हस्ते ध्वजारोहण, तर माजी ग्रामपंचायत सदस्य राहूल शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजपूजन करण्यात आले.

सिद्धार्थनगर येथे विजय गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच सुप्रिया कंद यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजपूजन करण्यात आले. सहकारनगर येथे बंडू देवकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण, तर संजय दोरगे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमांना सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असून संपूर्ण लोणीकंद परिसरात उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930