संवाद पुनर्वसन केंद्रात ८० वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
कोरेगाव भीमा : मनोब्रम्हा फाऊंडेशन संचालित संवाद पुनर्वसन केंद्र, कोरेगाव भीमा येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण व विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून ॲड. वंदना चंद्रकांत डांबरे तसेच उज्ज्वला नवले यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा केला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात आले. तसेच प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी आपले कर्तव्य, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पायल डोळस यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. सुप्रिया चत्तर चव्हाण यांनी केले. यावेळी केंद्रातील मनोमित्रांनी देशभक्तीपर गीत, भाषणे व विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हेमंतकुमार मुळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव माने, रूपाली कदम, भाग्यश्री रांदळे, स्वाती जाधव तसेच मनोब्रम्हा फाऊंडेशनचे सर्व मनोमित्र व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा स्वातंत्र्यदिनाचा विशेष कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





