वाघोलीत ‘वीरांचे वीर धर्मवीर’ शंभू चरित्राला उत्स्फूर्त प्रतिसाद
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
वाघोली : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित ‘वीरांचे वीर धर्मवीर – शंभू चरित्र जन्मापासून अमरत्वापर्यंत’ या दृकश्राव्य माध्यमातून सादर करण्यात आलेल्या अभिनव कार्यक्रमाला शंभूभक्त, शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हा कार्यक्रम द लेक्सिकन इंटरनॅशनल स्कूल वाघोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात निलेश रमेश भिसे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या अमर बलिदानापर्यंतचा इतिहास प्रभावीपणे उलगडून सांगितला.
संभाजी महाराजांचे शौर्य, विद्वत्ता, धर्मनिष्ठा आणि स्वराज्य रक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. दृकश्राव्य माध्यमातून मांडण्यात आलेल्या या इतिहासामुळे उपस्थितांना संभाजी महाराजांच्या जीवनकार्याची प्रभावी अनुभूती मिळाली.कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिलिंद वाईकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे विचार, कार्य आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले योगदान पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे आयोजन विवेक व्यासपीठ आणि नलिनी आशिष वायाळ यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनन्या वायाळ यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या शौर्य, त्याग आणि विचारांचे संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





