नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , वाजेवाडीत श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

वाजेवाडीत श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वाजेवाडी : प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील वाजेवाडी येथील श्रीकृष्ण मंदिरात शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

उत्सवानिमित्त सकाळपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व पंचामृताने मंगलस्नान घालण्यात आले. त्यानंतर मूर्तीला नवीन वस्त्रे परिधान करून आकर्षक सजावट करण्यात आली व पाळण्यात विराजमान करण्यात आले. लोणी-साखरेचा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली.

भाविकांनी दिवसभर उपवास करून श्रीकृष्ण जन्मोत्सवाची आतुरतेने प्रतीक्षा केली. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. यावेळी ‘जय श्रीकृष्ण’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. जन्मोत्सवानंतर भाविकांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. तसेच दिसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, ग्रामस्थ व धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळाच्या वतीने सायंकाळी देवाची निशाण मिरवणूक काढण्यात आली.यावेळी  माजी उपसरपंच अमित सोनवणे, जगदीश तिखे, माचिंद्र तिखे, राजू भोर, प्रवीण भोर, चंद्रकांत धनवडे, किरण पावसे, मनोज सोनवणे, सुभाष भोर, दत्तात्रय वाजे, दत्ता सोनवणे, गोविंद गावडे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.रात्री भोंडवे वस्ती येथील जय हनुमान एकतारी भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. भक्तिगीते व भजनांनी परिसर भक्तिमय झाला.भजन-कीर्तन, निशाण मिरवणूक आणि मध्यरात्रीचा श्रीकृष्ण जन्मोत्सव अशा विविध धार्मिक परंपरांनी वाजेवाडीतील जन्माष्टमी उत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930