नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी नानासाहेब आंबनावे यांची बिनविरोध निवड – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी नानासाहेब आंबनावे यांची बिनविरोध निवड

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी नानासाहेब आंबनावे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदासाठी आंबनावे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.

उपसभापती मनीषा हरपळे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसभापतीपदासाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक चुरस न होता आंबनावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सभापती प्रकाश जगताप, माजी सभापती दिलीप काळभोर तसेच संचालक राजाराम कांचन, गणेश घुले, प्रशांत काळभोर, नितीन दांगट, दत्तात्रय पायगुडे, सुदर्शन चौधरी, लक्ष्मण केसकर, सारिका हरगुडे, मनीषा हरपळे, रविंद्र कंद आणि संतोष नांगरे यासह माहिती सेवा समितीचे संस्थापक चंद्रकांत वारघडे, ईश्वर गाडुते, मिलिंद हरगुडे, संदेश आव्हाळे, राजेंद्र खांदवे, नवनाथ काकडे आदी उपस्थित होते.

उपसभापतीपदाच्या निवडीचा ठराव संतोष नांगरे यांनी मांडला, तर शशिकांत गायकवाड यांनी अनुमोदन दिले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी नानासाहेब आंबनावे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

 

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930