नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें ,  नगर रोड वाहतूक कोंडी संदर्भात उपाय योजना करण्यासाठी कृती समितीची बैठक संपन्न  – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

 नगर रोड वाहतूक कोंडी संदर्भात उपाय योजना करण्यासाठी कृती समितीची बैठक संपन्न 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

लोणीकंद : पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील वाघोली, केसनंद व लोणिकंद परिसरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे नगर रोड वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक बकोरी येथील गोविंद बाग बँकेट हॉलमध्ये नुकतीच पार पडली. वाहतूक कोंडीवर केवळ तात्पुरती उपाययोजना न करता ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.

वाघोली, केसनंद व लोणिकंद परिसरातून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक तसेच प्रवासी ये-जा करतात. मात्र वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना तासनतास रस्त्यावर अडकून पडावे लागत आहे. यामुळे वेळ, इंधन व आर्थिक नुकसान होत असून रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि अत्यावश्यक सेवांनाही मोठा अडथळा निर्माण होत आहे.

या गंभीर समस्येवर नागरिकांना एकत्रित करून लढा उभारण्यासाठी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गोविंद वारघडे यांच्या पुढाकाराने पुणे नगर रोड वाघोली–केसनंद वाहतूक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अवघ्या दोन-तीन दिवसांत सुमारे २४० नागरिक सहभागी झाले असून वाहतूक पोलीस व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनाही या माध्यमातून जोडण्यात आले आहे.

बैठकीत वाघोली, केसनंद व लोणिकंद परिसरातील प्रमुख चौकांचे रुंदीकरण, वाढत्या वाहतुकीनुसार रस्त्यांचे रुंदीकरण, पर्यायी मार्ग तातडीने सुरू करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्युत पोल हलविणे, पुणे–अहिल्यानगर रोडवरील खड्डे बुजविणे आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

तसेच रस्त्यावर अनधिकृतपणे प्रवासी वाहने थांबविणाऱ्यांवर कारवाई, लक्झरी बस व मोठ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी रोखणे, आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग व सिग्नल व्यवस्था करणे, गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची प्रभावी नियुक्ती करणे तसेच अपघातप्रवण व कोंडीच्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

कृती समितीच्या माध्यमातून संबंधित विभाग, प्रशासन व लोकप्रतिनिधींना सविस्तर निवेदन देऊन तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी करण्यात येणार आहे. मात्र निवेदन देऊनही ठोस कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या सहकार्याने उपोषण, आंदोलन व लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी जनसेवक संपत आबा गाडे यांच्या हस्ते श्रीगणेशाचे पूजन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली. नगर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संपत आबा गाडे यांच्यासह माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश सातव, केसनंदचे सरपंच विशाल हरगुडे, माजी सरपंच दत्तात्रय हरगुडे, सामाजिक कार्यकर्ते हिरामण वाघमारे, तुशार सातव, जगदिश बजाज, कमलेश बहिरट, गणेश जाधव, प्रकाश नागरवाड, पंडित कोलते, संजय टकले, वाघोली वाहतूक विभागाचे प्रमुख अधिकारी किशोर तणपुरे, विक्रम घडदे, गणेश हरगुडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

वाघोली–केसनंद–लोणिकंद परिसरातील वाहतूक कोंडी ही केवळ काही व्यक्तींची समस्या नसून हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याबरोबरच कोंडीच्या ठिकाणांची माहिती, फोटो व व्हिडिओ कृती समितीच्या माध्यमातून संबंधित विभागापर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन करण्यात आले.

तात्पुरती वाहतूक व्यवस्था नको, तर वाघोली–केसनंद–लोणिकंद परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा हवा अशी ठाम भूमिका बैठकीत घेण्यात

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930