आदर्श शिक्षिका अनिता परदेशी यांना ‘ग्लोबल गुरुजी’ पुरस्कार; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
फुलगाव (गौतम पाटोळे) : खेड तालुक्यातील धानोरे येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आदर्श शिक्षिका अनिता शरद परदेशी यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल गुरुजी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत सिंगापूर येथील आधुनिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धती पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्याच्या उद्देशाने ‘ग्लोबल गुरुजी’ पुरस्कार उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सुमारे १२०० शिक्षकांमधून ४५ शिक्षकांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये धानोरे शाळेच्या आदर्श शिक्षिका अनिता परदेशी यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे, या कार्याची पावती म्हणून त्यांची झालेली निवड ही धानोरे शाळेसाठी तसेच संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
अनिता परदेशी यांच्या निवडीचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत धानोरे, विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी शैक्षणिक दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.
‘श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार’ या उपक्रमाशी शाळेचा संबंध असून, परिवाराच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे तसेच आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अनिता परदेशी यांचे अभिनंदन केले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या अनिता परदेशी यांचा ‘ग्लोबल गुरुजी’ पुरस्कार हा त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव असून, त्यांच्या यशामुळे धानोरे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





