नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , प्रदीप कंद यांच्या पुढाकाराने शिंदे वस्तीतील नागरिकांची लाईटची समस्या मार्गी – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

प्रदीप कंद यांच्या पुढाकाराने शिंदे वस्तीतील नागरिकांची लाईटची समस्या मार्गी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद टाईम्स प्रतिनिधी

वडगाव शिंदे – काकडे गाव परिसरातील शिंदे वस्ती येथे काही दिवसांपूर्वी अचानक वीजपुरवठा खंडित होण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. वस्तीतील मुख्य लाईनवरील डीपी (Distribution Point) पूर्णतः जळाल्याने बोरवेलची मोटर बंद पडली, तसेच घरोघरी असलेली सर्व विजेवर चालणारी उपकरणे ठप्प झाली. यामुळे सुमारे हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला होता.

ग्रामस्थांना दोन दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने परिस्थिती चिंताजनक होत चालली. या गंभीर समस्येची माहिती वस्तीतील एक नागरिकांनी तात्काळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप वसंत कंद यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून दिली.

समस्येची तातडी ओळखून भाऊंनी कोणतीही विलंब न करता खेड येथील चाकण विभागातील विद्युत अभियंत्यांशी संपर्क साधला. परिस्थितीची सविस्तर माहिती देत डीपी बदलण्याची तातडीची गरज अधोरेखित केली. प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करून फक्त दोन दिवसांत नवीन डीपी मंजूर करून घेतली, ज्यामुळे वस्तीतील वीजपुरवठा व बोरवेल पुन्हा सुरू झाला. यामुळे नागरिकांना मिळालेले पिण्याचे पाणी व नियमित वीजपुरवठा या दोन्ही समस्या त्वरित मार्गी लागल्या.

ग्रामस्थांनी प्रदीप वसंत कंद यांच्या वेगवान, तत्पर आणि लोकाभिमुख कार्याची प्रशंसा करत मनपूर्वक स्वागत व अभिनंदन केले. ग्रामीण भागात उद्भवलेल्या तातडीच्या समस्यांवर योग्य वेळी उपाययोजना करून भाऊंनी दाखवलेली संवेदनशीलता आणि जबाबदारी सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. ग्रामस्थांत सर्वत्र भाऊंबद्दल समाधान व कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930