पिंपरी–सांडस शाळेचा यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा स्पर्धेत झळाळता विजय
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद टाईम्स, प्रतिनिधी
लोणीकंद जिल्हा परिषद शाळेत आयोजित बीटस्तरीय यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा स्पर्धेत पिंपरी–सांडस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अतुलनीय कामगिरी नोंदवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या कार्यक्रमास केंद्रप्रमुख शांता इचके मॅडम, विस्तार अधिकारी मुंडे सर, पालक तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोकनृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेले अप्रतिम आणि मोहक नृत्य विशेष आकर्षण ठरले. उत्कृष्ट सादरीकरणामुळे पिंपरी–सांडस शाळेच्या लोकनृत्य पथकाची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे संचार झाले आहे.
स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी दाखवलेली मेहनत, आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि कलागुणांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या परिश्रमांमुळे शाळेच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे.या उल्लेखनीय यशामागे शाळेच्या मार्गदर्शक मुख्याध्यापिका संजीवनी देंडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक राजू चिंचकर, तृप्ती पारधे यांनीही विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत मौल्यवान योगदान दिले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व पालक वर्गाचे पिंपरी सांडस गावचे विद्यमान सरपंच साधना भोरडे, माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य अशोक भोरडे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष काजल चव्हाण,माजी अध्यक्ष संतोष कंचे, कैलास भोरडे, विकास भोरडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षकांचे आभार व्यक्त केले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





