मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अमित सोनवणे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
शिरूर | प्रतिनिधी
पुण्यनगरीचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते शिरूर तालुक्यातील वाजेवाडी गावचे माजी उपसरपंच अमित तानाजी सोनवणे यांच्या कार्य अहवालाचे भव्य प्रकाशन संपन्न झाले.या कार्यक्रमास आजी–माजी पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमित सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माझे मार्गदर्शक व आधारस्तंभ असलेल्या मुरलीधर मोहोळ अण्णांच्या शुभहस्ते माझ्या कार्य अहवालाचे प्रकाशन होणे, हा क्षण माझ्यासाठी केवळ सन्मानाचा नसून एका मोठ्या बंधूच्या मायेची आणि भक्कम पाठबळाची साक्ष देणारा आहे. कोणतीही अडचण असो, केवळ एक फोन किंवा मेसेज केला तरी अण्णांनी नेहमीच तातडीने प्रतिसाद दिला. त्यांचे मार्गदर्शन म्हणजे प्रत्येक कठीण प्रसंगी उभं राहण्याचं बळ आहे. त्यांच्या सारखा खंबीर नेता माझ्या पाठीशी आहे, हा विश्वासच माझ्या कार्याची खरी ऊर्जा आहे.
या प्रसंगी सोनवणे यांनी मुरलीधर मोहोळ यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





