राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
बृहन्मुंबईसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बुधवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून गुरुवार, १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह एकूण २ हजार ८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. या सर्व महानगरपालिका क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपस्थित होते. यावेळी आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहूनच सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना १६ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार असून उर्वरित २८ महानगरपालिकांची अधिसूचना १८ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील.सर्व महानगरपालिकांसाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी निश्चित करण्यात आली आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





