पुण्याच्या क्षत्रिय कराटे स्पोर्ट्स अकॅडमीचे विशाखापट्टणम येथे दैदीप्यमान यश
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद, प्रतिनिधी
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे दिनांक २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या २८ व्या ओकिनावा मार्शल आर्ट नॅशनल टूर्नामेंटमध्ये पुण्याच्या लोणीकंद येथील क्षत्रिय कराटे स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
चार दिवस चाललेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अकॅडमीतील ८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. काता (Kata) व फाईट (Fight) या दोन कॅटेगरीमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत खेळाडूंनी एकूण ६ सुवर्ण, ६ रौप्य व ४ कांस्य पदके पटकावून लोणीकंद परिसराचा नावलौकिक वाढवला.
या स्पर्धेत रिधांश शिंदे, आरोही भांदिर्गे, श्लोक वाळुंज, साक्षी जगताप, हर्षल मोरे, नित्या कंद, प्रणव गायकवाड व प्रणाली गायकवाड यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई केली. या यशामागे अकॅडमीच्या प्रशिक्षिका सुनीता भांदिर्गे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या राष्ट्रीय यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षिकेचे लोणीकंद ग्रामस्थांकडून तसेच पालकांकडून मनापासून कौतुक होत असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





