म्हसोबारायाच्या चरणी पैलवान किरण साकोरे यांच्या प्रचाराचा नारळ; लोणीकंद–पेरणे गटात राजकीय रणशिंग
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद, प्रतिनिधी
लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील उमेदवार पैलवान किरण संपत साकोरे यांनी लोणीकंदचे आराध्य दैवत श्री म्हसोबा रायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या निवडणूक प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला. शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी पारंपरिक पद्धतीने नारळ फोडत लोणीकंद गावात प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
दैवताच्या आशीर्वादाने व जनतेच्या विश्वासाच्या बळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार साकोरे यांनी यावेळी व्यक्त केला. सामान्य नागरिकांचे प्रश्न, गावाचा सर्वांगीण विकास, युवकांसाठी रोजगार व शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस भूमिका घेणार, असा स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या प्रचारातून दिला.
या प्रचाराच्या शुभारंभावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नारायण कंद, सरपंच मोनिका कंद, मंदा साकोरे, श्रीकांत कंद, गुलाब कंद, बाळासाहेब मोरे, सागर झुरुंगे, जय कंद, अविनाश साकोरे, चंद्रकांत साकोरे, गौरव झुरुंगे, सागर कंद यांच्यासह महिला भगिनी, ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पैलवान किरण साकोरे यांच्या प्रचाराला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, निवडणुकीच्या मैदानात खरी लढत रंगण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





