शौर्यदिनानिमित्त योगेशभाऊ झुरुंगे मित्र परिवार आयोजित अन्नदान
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद, प्रतिनिधी :
२०८ व्या शौर्यदिन व विजय दिवसाच्या निमित्ताने बहुजन समाजातील ५०० शुरवीरांना मानवंदना देण्यासाठी आलेल्या अनुयायीसाठी लोणीकंद येथील खंडोबा माळ परिसरात योगेशभाऊ झुरुंगे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अन्नदान वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

हा उपक्रम सम्यक बहुद्देशीय संघ, बकोरी रोड लोणीकंद व योगेशभाऊ झुरुंगे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते, तरुण वर्ग, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शौर्य, स्वाभिमान आणि सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या भिमा कोरेगाव विजय दिवसाचे स्मरण करताना आयोजकांनी शौर्यगाथेतील शुरवीरांना मानवंदना अर्पण केली व सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. या अन्नदान उपक्रमामुळे नागरिकांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





