शिवसेनेच्या रणरागिनी अमृत पठारे यांना मतदारांचा मोठा पाठिंबा
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
खराडी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून पुणे महानगरपालिका निवडणूक – २०२६ साठी खराडी–वाघोली प्रभाग क्र. ०४ मधून अमृत कैलास पठारे यांना मशाल या निवडणूक चिन्हावर अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षासाठी दीर्घकाळ एकनिष्ठपणे समाजसेवा केल्याची पोचपावती म्हणूनच पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
गेल्या १५ वर्षांपासून महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे अमृत पठारे या “शिवसेनेच्या महिला रणरागिनी” म्हणून ओळखल्या जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत अमृत पठारे यांनाच निवडून देण्याचा निर्धार प्रभागातील महिला भगिनींनी व्यक्त केला आहे.
महिला सक्षमीकरणासाठी अमृत बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून वंचित, पीडित व गरजू घटकांना मदत, वृद्धाश्रम, अनाथालये व विविध निराधार संस्थांना नियमित सहकार्य, तसेच कोरोना काळातील अतुलनीय सामाजिक कार्य यामुळे त्यांना मोठा जनसमर्थन लाभला आहे. कोल्हापूर व सांगली येथे आलेल्या महापुराच्या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी त्यांनी केलेले मदतकार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
याशिवाय विविध शाळा व शिक्षण संस्थांना त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळे पालकवर्गातही त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला असून, त्यामुळे खराडी–वाघोली प्रभागातून त्यांना मोठ्या प्रमाणात मतदारांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





