नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेबाबत संयुक्त बैठक – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेबाबत संयुक्त बैठक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती हवेली सार्वत्रिक निवडणूक – २०२६ च्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने निवडणूक प्रक्रियेतील नियम, सूचना व माहिती देण्यासाठी १६ जानेवारी २६ रोजी सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज, आंबेगाव येथे संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीचे आयोजन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हवेली यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. बैठकीला सर्व पक्षीय पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, पोलिस प्रशासन तसेच निवडणूक प्रक्रियेत कार्यरत प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी शिरूर–हवेली विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात विविध मुद्दे मांडले. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्याकडे खालील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर २०० मीटर अंतरावर लावण्यात येणाऱ्या बुथवर मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते बसलेले असतात. या बुथवर मतदारांना पक्षाचे चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या देण्यात येतात, यावर बंदी घालावी.

प्रचार वाहनांच्या परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज करताना वेबसाइटच्या अडचणी येतात, त्यामुळे ऑफलाइन अर्जाची व्यवस्था ठेवावी.बुथवर फक्त एक टेबल व एक खुर्ची असावी.बुथवर खाण्याचे पदार्थ ठेवण्यास बंदी असावी, जेणेकरून मतदारांना कोणतेही प्रलोभन देता येणार नाही. बुथवर मतदारांना पक्षाचे चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या देऊ नयेत. पक्षाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते गर्दी करून मतदारांवर दबाव टाकत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या सर्व मुद्द्यांची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी पोलिस प्रशासन व निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई व नियंत्रणाबाबत स्पष्ट सूचना दिल्या. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, शांततेत व नियमबद्ध पद्धतीने पार पाडली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला पोलिस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच निवडणूक प्रक्रियेत कार्यरत सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930