योगेश झुरुंगे यांची प्रचारात आघाडी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद / प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात तिरंगी लढतीचे स्पष्ट संकेत मिळत असून, ही लढत दिवसेंदिवस अधिकच अटीतटीची होत चालली आहे.

या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सरसिटणीस प्रदीप वसंत कंद यांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश करत निवडणूक रणांगणात उडी घेतल्याने त्यांची ताकत वाढली आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली फुलगावचे सोसायटीचे चेअरमन पै.किरण संपत साकोरे यांचाही प्रचारात जोरदार सुरु आहे.
दरम्यान, लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या संभाव्य पक्षप्रवेश आणि उमेदवारीबाबत हालचालींना वेग आला असून, प्रत्यक्ष प्रचारात त्यांनी आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कोणत्याही पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर नसतानाही झुरुंगे यांचा होम-टु-होम संपर्क, स्थानिक कार्यकर्त्यांची फळी आणि मतदारांशी थेट संवाद यामुळे प्रतिस्पर्ध्यांची चिंता वाढली आहे.
बदललेली गट रचना, आरक्षणाचे नवे गणित आणि स्थानिक पातळीवरील जुन्या-नव्या वादांमुळे ही निवडणूक फक्त पक्षीय नव्हे, तर व्यक्तिकेंद्रित लढत बनत चालली आहे. धार्मिक यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘होम मिनिस्टर’ सारखे उपक्रम काही प्रमाणात थंडावले असले.तरी सर्व उमेदवार मतदारांच्या घराघरात जाऊन गाठी भेटी घेत संपर्क वाढवत आहे.
आगामी काही दिवसांत उमेदवारी चित्र स्पष्ट होणार असले, तरी सध्याची परिस्थिती पाहता लोणीकंद–पेरणे गटातील ही निवडणूक संपूर्ण हवेली तालुक्याचे लक्ष वेधणारी आणि निकालापर्यंत धडकी भरवणारी ठरणार, हे मात्र निश्चित आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





