पै.किरण साकोरे यांच्या नेतृत्वावर बैलगाडा मालकांचा विश्वास; जाहीर पाठिंबा
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
बैलगाडा मालक संवाद मेळाव्यात शेकडो गाडामालकांचा जाहीर पाठिंबा
लोणीकंद | प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात भाजपाच्या उमेदवारीसाठी आघाडीवर असलेले पै. किरण साकोरे यांच्या पुढाकारातून आयोजित बैलगाडा मालक संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

या मेळाव्यास या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र नारायण कंद, भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक व आंबेगाव तालुका बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष जयसिंग एरंडे यांच्यासह लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी ग्रामस्थ तसेच पुणे जिल्ह्यातील हजारो बैलगाडा मालक, चालक व गाडा प्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
मेळाव्यातून लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात भाजपाच्या वतीने निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार पै. किरण साकोरे यांनी जाहीर केला.मेळाव्यात उपस्थित अनेक बैलगाडा मालकांनी आपली मते मांडत पै. किरण साकोरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची जाहीर घोषणा केली. जिल्हा परिषदेमार्फतच ग्रामीण क्रीडा, पारंपरिक संस्कृती आणि युवकांना न्याय मिळू शकतो, असा विश्वास यावेळी गाडा मालकांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र नारायण कंद, भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक व आंबेगाव तालुका बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष जयसिंग एरंडे यांच्यासह लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील बैलगाडा मालक, चालक, गाडा प्रेमी तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संवाद मेळाव्यामुळे लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात पै. किरण साकोरे यांची उमेदवारी अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले, तर आगामी निवडणुकीत बैलगाडा मालकांनी किरण साकोरे यांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





