नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , योगेश झुरुंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविणार – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

योगेश झुरुंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविणार

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद / प्रतिनिधी :

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील बहुचर्चित गट क्रमांक ३७ पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटातून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे उमेदवार म्हणून लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपजिल्हाप्रमुख शिवसेना निलेश काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश करून झुरुंगे हे धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.

याच वेळी लोणीकंद पंचायत समिती गणातून वंदना अण्णासो शिवले तसेच पेरणे पंचायत समिती गणातून छाया ज्ञानेश्वर वाळके यांनी पंचायत समिती सदस्य पदासाठी मंगळवार (दि. २१) रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. हे उमेदवारही धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (हवेली) यशवंत माने यांच्याकडे आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केले.

अर्ज दाखल करताना उपजिल्हाप्रमुख निलेश काळभोर, लोणीकंदच्या माजी सरपंच प्रियांका झुरुंगे, पेरणेचे माजी उपसरपंच चांगदेव कोळपे, ज्ञानेश्वर वाळके, अण्णासो शिवले, सागर झुरुंगे, दीपक झुरुंगे, किसन टुले, भारत झुरुंगे यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या पेरणे–लोणीकंद गटातून उमेदवारी दाखल केल्यानंतर योगेश झुरुंगे यांनी जनतेच्या विश्वासावर विकासाची नवी दिशा देण्याचा संकल्प व्यक्त केला. शिवसेनेच्या ध्येयधोरणांनुसार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे, ग्रामीण विकासाला गती देणे आणि पारदर्शक कारभार करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930