नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पुण्याच्या नगरसेवकाच्या पत्नी प्रदीप कंदांच्या प्रचारासाठी मैदानात – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

पुण्याच्या नगरसेवकाच्या पत्नी प्रदीप कंदांच्या प्रचारासाठी मैदानात

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद–पेरणे गटात प्रचाराला उभारी, महिला मतदारांमध्ये उत्साह

लोणीकंद, प्रतिनिधी

पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ (ड) सुस–बाणेर–पाषाण प्रभागातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ या चिन्हावर निवडून आलेले आणि आपल्या विकासाभिमुख कामगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिलेले नवनिर्वाचित नगरसेवक अमोल रतन बालवडकर यांच्या पत्नी स्नेहल अमोल बालवडकर यांनी हवेली तालुक्यातील लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रदीप वसंत कंद यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या गटातील प्रचाराला मोठी उभारी मिळाली असून, विशेषतः महिला मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रचार दौऱ्यादरम्यान स्नेहल बालवडकर यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रदीप कंद यांच्या सामाजिक व विकासकामांची माहिती देत, त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. बाणेर–बालेवाडी परिसरात राबविण्यात आलेल्या विकास मॉडेलप्रमाणेच लोणीकंद–पेरणे गटातही सर्वांगीण विकासासाठी प्रदीप कंद यांना पाठिंबा देण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

जनसंपर्कापुरते न थांबता, स्नेहल बालवडकर यांनी प्रचार यंत्रणेच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना, विशेषतः महिला भगिनींना सखोल मार्गदर्शन केले. निवडणूक काळात प्रचार कसा प्रभावी करावा, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रणनीती कशी आखावी तसेच बूथ स्तरावर महिलांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवाचा लाभ प्रचार व्यवस्थापनाला होत असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.या प्रचार दौऱ्यादरम्यान प्रदीप कंद यांच्या पत्नी प्रिया प्रदीप कंद यांनी स्नेहल बालवडकर यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. दोन खंबीर महिला नेतृत्व एकत्र आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

यावेळी स्थानिक महिला पदाधिकारी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. स्नेहल बालवडकर यांच्या सहभागामुळे लोणीकंद–पेरणे गटात प्रदीप कंद यांची बाजू अधिक भक्कम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930