नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य महिला मेळावा – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य महिला मेळावा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी

शाश्वत विकासाचा विचार म्हणूनच भाजपाला पुन्हा संधी द्यावी, असा निर्धार व्यक्त करत लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गट क्रमांक ३७ अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त व भरगोस प्रतिसाद लाभला.

या मेळाव्यात ३७ लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार किरण संपत साकोरे, ७३ लोणीकंद पंचायत समिती गणातील उमेदवार मोनिका श्रीकांत कंद तसेच ७४ पेरणे पंचायत समिती गणातील उमेदवार राणी दत्तात्रय वाळके यांच्या प्रचारार्थ महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी महिलांनी भाजप सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या विविध विकासात्मक योजना, महिला सक्षमीकरणाचे उपक्रम, स्वयंरोजगार, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील कामगिरी यांचा आढावा घेतला. “चप्पा-चप्पा भाजप” अशा घोषणा देत परिसरात भाजपाच्या प्रचाराला वेग देण्यात आला.

महिला मेळाव्यात बोलताना वक्त्यांनी सांगितले की, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षितता या बाबींमध्ये भाजपाने सातत्याने काम केले असून हा विकासाचा प्रवास अखंड सुरू ठेवण्यासाठी भाजपाला पुन्हा संधी देणे गरजेचे आहे.

मेळाव्याच्या माध्यमातून महिला मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930