नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , काळाच्या पडद्याआड गेलेल्या पारंपरिक खेळात लोणीकंद शाळेचा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

काळाच्या पडद्याआड गेलेल्या पारंपरिक खेळात लोणीकंद शाळेचा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद | प्रतिनिधी

काळाच्या पडद्याआड गेलेल्या आट्यापाट्या व लेझीम या पारंपरिक खेळांमध्ये लोणीकंद जिल्हा परिषद शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ‘यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा’ नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, फुलगाव (ता. हवेली) येथे पार पडल्या.

२०२५–२६ या शैक्षणिक वर्षात आयोजित या स्पर्धांमध्ये लोणीकंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत जिल्हास्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली. या यशाबद्दल पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा पीडीसीसी बँक संचालक प्रदीप कंद, सरपंच मोनिका कंद, उपसरपंच डॉ. सोनाली जगताप, शिक्षणतज्ज्ञ गोरक्षनाथ झुरुंगे, माजी सरपंच श्रीकांत कंद, राहुल शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय कंद, उपाध्यक्ष गोपीनाथ कंद आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कौतुक केले. सर्व स्तरांतून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व तसेच सुनिता टोपे, राजकुमार गिरी, अलका शिंदे, गोरक्ष हिंगे, राजश्री कंद, फरजाना शेख, राजश्री शेंडे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.लोणीकंद शाळेच्या या भव्य-दिव्य यशोगाथेमुळे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

 

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930