पेरणेफाटा येथे बुलेटची चोरी; लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद, प्रतिनिधी
पेरणेफाटा येथील जय स्तंभाजवळ, डी.सी. बारच्या पाठीमागील परिसरात पार्क केलेली रॉयल एनफिल्ड बुलेट मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत पन्नास हजार रुपये आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत बाबुराव वाघमारे (वय ४०, रा. पेरणे फाटा, ता. हवेली) यांचा आकाश वॉशिंग सेंटर हा व्यवसाय असून ते पत्नी व मुलासह वास्तव्यास आहेत. त्यांच्या ताब्यात मेहुण्याच्या नावावर नोंद असलेली काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड बुलेट (क्रमांक एम.एच. १२ एम.पी. ७२५४) होती. दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास सदर मोटार सायकल घरासमोर पार्क करून ठेवण्यात आली होती. मात्र, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाहणी केली असता ती जागेवर आढळून आली नाही. परिसरात शोध घेतला असता मोटार सायकल सापडली नाही.
या प्रकरणी प्रशांत वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





