नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद : प्रदीपभाऊ कंद मित्रपरिवाराच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद : प्रदीपभाऊ कंद मित्रपरिवाराच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, या पार्श्वभूमीवर लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. सदर शोकसभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रदीप वसंत कंद तसेच प्रदीपभाऊ कंद मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

गुरुवार (दि. २९) रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद येथील आळंदी फाटा चौकात मेणबत्त्या प्रज्वलित करून उपस्थित नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

लोणीकंद–तुळापूर फाटा येथे पार पडलेल्या या शोकसभेला लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटांचे मौन पाळून स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अजितदादा पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कर्तृत्ववान नेतृत्वाने व कार्यक्षम कार्यशैलीने असंख्य कार्यकर्त्यांना दिशा व प्रेरणा मिळाली. त्यांच्या जाण्याने सर्वसामान्य कार्यकर्ते व नागरिकांमध्ये तीव्र दुःखाची भावना पसरली असून, बोलताना अनेकांच्या अश्रूंना वाट मोकळी झाली.

शोकसभेच्या समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रदीप वसंत कंद यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, “अजितदादा हे खऱ्या अर्थाने कामाचे माणूस होते. आपणही सर्वजण कामाचेच माणसे आहोत. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत नागरिकांच्या कामासाठी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेत लोकांची कामे प्रामाणिकपणे करत राहू आणि त्यांच्या स्वप्नांना उजाळा देऊ,” अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली.शोकसभा शांत, गंभीर आणि शोकाकुल वातावरणात पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रभर अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930