नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे आकस्मिक निधन – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे आकस्मिक निधन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पोलीस दलासह सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कुंभार साहेब हे कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि सामान्य नागरिकांशी आपुलकीने वागणारे अधिकारी म्हणून परिचित होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणे व निष्ठेने आपली सेवा बजावली. त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलाने एक अनुभवी, संवेदनशील व कर्तृत्ववान अधिकारी गमावला आहे.

ते गेल्या दीड वर्षांपासून लोणीकंद पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक संवेदनशील प्रकरणे कौशल्याने हाताळून नागरिकांचा विश्वास संपादन केला होता.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा सिद्धेश (वय १३ वर्षे) असून मुलगी सिद्धी (वय १९ वर्षे) ही जयसिंगपूर येथे (BAMS )चे शिक्षण घेत आहे. साहेबांचा अंत्यविधी शासकीय मानवंदनेत त्यांच्या मूळ गावी मुक्काम पोस्ट चावरे तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर येथे होणार आहे.

या दुःखद प्रसंगी कुंभार कुटुंबीयांप्रती, आप्तेष्टांप्रती व संपूर्ण पोलीस दलाप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930