नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी :

यंदाच्या दहावीच्या बोर्ड परीक्षा २२ फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित हवेली तालुक्यातील लोणीकंद येथील डॉ. बसू विद्याधाम शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावर्षी दहावीच्या तीन तुकड्यांमधील एकूण १९१ विद्यार्थी बोर्ड परीक्षेला सामोरे जाणार असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते उत्तम भोंडवे, हभप गुलाब कंद, रघुनाथ कंद, सोपान कंद तसेच मुख्याध्यापक बाबुराव कोकाटे, वर्गशिक्षक मंगला शिंदे, सुधीर गायकवाड, मंगेश गवळी व शिक्षकवृंद उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी जीवनात पुढे कसे घडावे, शिक्षणासोबत संस्कारांचे महत्त्व काय आहे याविषयी मार्गदर्शन केले. परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे तसेच सकारात्मक विचार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पार्थ गोणेया यांनी मनोगत व्यक्त करताना भावनिक शब्दांत आपल्या भावना मांडल्या. आज शाळेला निरोप देताना मन भरून आले आहे. येथे मिळालेले शिक्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांसोबतच्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतील. शाळेने आम्हाला चांगला माणूस बनायला शिकवले. आमच्या आयुष्याचा मजबूत पाया याच शाळेत घातला गेला असून शिक्षकांनी दिलेले ज्ञान व संस्कार पुढील वाटचालीत नक्की उपयोगी पडतील, असे त्यांनी सांगत सर्व शिक्षक व शाळेचे आभार मानले.

कार्यक्रम उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक प्रवासासाठी आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930