नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद : पुणे–नगर महामार्गावर धोकादायक पद्धतीने पाइपलाईन काम; कराराच्या अटींचे उल्लंघन? – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद : पुणे–नगर महामार्गावर धोकादायक पद्धतीने पाइपलाईन काम; कराराच्या अटींचे उल्लंघन?

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद प्रतिनिधी :

सार्वजनिक बांधकाम विभाग प्रकल्प विभाग, पुणे यांनी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे यांना पुणे–शिरूर–अहमदनगर राज्य महामार्ग क्र. ०५ वर पाण्याची पाइपलाईन टाकण्यासाठी परवानगी दिली आहे. रस्ता छेदताना आडवे दिशात्मक ड्रिलिंग पद्धतीने आडवे बोरिंग करून जलवाहिनी टाकण्याची स्पष्ट अट परवानगीपत्रात नमूद आहे.

मात्र प्रत्यक्ष ठिकाणी या अटींचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. आडवे दिशात्मक ड्रिलिंग पद्धतीऐवजी रस्त्याला आतून छेद देऊन मजूरांना खड्ड्यात उतरवून काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ही पद्धत अत्यंत धोकादायक असून मजुरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

कामाच्या ठिकाणी कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याचे आढळून आले आहे. मजुरांकडे हेल्मेट किंवा सेफ्टी गिअर नाही रस्त्यावर योग्य वाहतूक नियंत्रण व्यवस्था नाही खोल खड्ड्यात मजूर पाठवून पाइपलाईन टाकण्याचे काम यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

परवानगी देताना रस्ता ओलांडताना आडवे दिशात्मक ड्रिलिंग तंत्रज्ञानाचा वापर तसेच सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात या अटींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी तात्काळ पाहणी करून नियमबाह्य व धोकादायक काम थांबवावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031