नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , सुप्रिया कंद यांची लोणीकंद गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

सुप्रिया कंद यांची लोणीकंद गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद, प्रतिनिधी :

हवेली तालुक्यातील लोणीकंद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत सुप्रिया जय कंद यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

लोणीकंद सरपंचपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्ग (महिला) असे आहे. सरपंच मोनिका कंद यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत सुप्रिया कंद यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप झिंगाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने सुप्रिया कंद यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पीडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक आणि भाजप पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी सुप्रिया कंद यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी हवेली पंचायत समिती सदस्य मोनिका कंद, राणी वाळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नारायण कंद, रविंद्र कंद, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय कंद, माजी सरपंच श्रीकांत कंद, जनार्धन वाळुंज, गंगाधर दळवी, बाळासाहेब मोरे, गुलाब कंद, गणेश जगताप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावणे, ग्राम महसूल अधिकारी अभिजित जोशी, तसेच आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुप्रिया कंद या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय आहेत. स्वच्छ भारत अभियान, वृक्षारोपण यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांत त्यांनी यापूर्वीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

नवनिर्वाचित सरपंच सुप्रिया कंद म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टीची पुणे जिल्हा अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पीडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक प्रदीपदादा कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायणराव कंद तसेच लोणीकंदमधील ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे मला सरपंच पदाची जबाबदारी मिळाली. त्याबद्दल मी संपूर्ण गावाची ऋणी आहे. भविष्यात प्रदीपदादांनी पाहिलेल्या स्वप्नातील लोणीकंद घडविण्यासाठी मी कटीबद्ध राहीन. लोणीकंद ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करणे, महिला व युवकांना संधी उपलब्ध करून देणे तसेच शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हे माझे प्रमुख ध्येय असेल, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.त्यांच्या या निवडीचे लोणीकंद गावासह परिसरात स्वागत होत आहे..

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031