मातृशोक : सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांच्या मातोश्रींचे निधन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणीकंद, प्रतिनिधी:
बकोरी तालुका हवेली येथील माहिती सेवा समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गोविंद वारघडे यांच्या मातोश्री श्रीमती कमल गोविंद वारघडे यांचे रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्या दत्त कृपा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माजी संस्थापक अध्यक्षा होत्या. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून, त्यांच्या या कार्यामागे आईचे संस्कार, प्रेरणा आणि मार्गदर्शन हेच मुख्य बळ होते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने बकोरी परिसराने कष्टाळू, जिद्दी, दूरदृष्टी असलेले व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या कार्याची व आठवणींची छाप समाजाच्या मनात कायम राहील.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





