नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणीकंद येथे श्री म्हसोबा देवाचा उत्सव  – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लोणीकंद येथे श्री म्हसोबा देवाचा उत्सव 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद (ता. हवेली) : गावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा देवाचा सालाबादप्रमाणे उत्सव यंदा चैत्र शुद्ध सप्तमी निमित्त बुधवार, दि. २५ मार्च ते शुक्रवार, दि. २७ मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि. २५) सकाळी ६ ते ८ या वेळेत श्रींची महापूजा व अभिषेक होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्या असून बैलगाडा प्रेमींसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत श्रींची पालखी मिरवणूक, छबिना व विविध भजनी मंडळांचे कार्यक्रम रंगणार आहेत.या बैलगाडा शर्यतीत सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गाडीला एकूण ११ लाख ११ हजार १२१ रुपयांचे आकर्षक बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

दुसऱ्या दिवशी (दि. २६) रामनवमी निमित्त ह.भ.प. शैलेश महाराज वाळुंज यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. सायंकाळी नामांकित पैलवानांचा कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार असून, रात्री सुप्रसिद्ध मंगला बनसोडे व नितीनकुमार बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा रसिकांचे मनोरंजन करणार आहे.

तिसऱ्या दिवशी (दि. २७) रात्री ९ वाजता ‘३६ नखरेवाली’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे. उत्सवाचे नियोजन गावातील सर्व तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ लोणीकंद यांच्या वतीने करण्यात आले असून पंचक्रोशीतील नागरिकांनी व भजनी मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930