तुळापूर येथे बैलगाडा शर्यत व यात्रा काळात एनर्जी ड्रिंक्स विक्रीवर बंदीची मागणी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
हवेली तालुक्यातील श्रीक्षेत्र तुळापूर गावातील पारंपरिक यात्रा व बैलगाडा शर्यतीच्या पार्श्वभूमीवर कॅफेनयुक्त एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे यांनी तुळापूर ग्रामस्थ व यात्रा समितीला निवेदन दिले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यात्रा काळात बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित असतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक ऊनामुळे त्रस्त होतात आणि त्यामुळे अनेकजण मोठ्या प्रमाणात एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतात. अशा पेयांमुळे युवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अशा एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने लिंबू सरबत, कैरी पन्हे, उसाचा रस आणि ताक यांसारख्या पारंपरिक व आरोग्यदायी पेयांना प्रोत्साहन द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
या मागणीवर यात्रा समितीने सकारात्मक प्रतिसाद देत, परिसरात सूचना फलक लावण्याचे आश्वासन दिले आहे.तुळापूरमधील या उपक्रमामुळे परंपरेसोबतच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





