नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , दरोड्याच्या तयारीतील गुन्ह्यातील फरारी आरोपी जेरबंद – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

दरोड्याच्या तयारीतील गुन्ह्यातील फरारी आरोपी जेरबंद

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वाघोली : दरोड्याच्या तयारीतील गुन्ह्यातील फरारी आरोपीस गुन्हे शाखा युनिट-७ च्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई दि. ३० मार्च २०२६ रोजी वाघेश्वर चौक, वाघोली येथे करण्यात आली. योगेश संजय शिरसाट (वय २४, रा. वडगावशेरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीसंदर्भात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-७चे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवणे व नितीन धाडगे हे वाघोली परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवत फरारी आरोपींचा शोध घेत होते.

याचवेळी पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे यांना गुप्त माहिती मिळाली की, फरारी आरोपी योगेश संजय शिरसाट हा वाघेश्वर चौक येथे थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी चंदननगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-७च्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930