नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लक्ष्मीतरु वृक्षांचे वाटप करून मातेला अखेरची श्रद्धांजली – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

लक्ष्मीतरु वृक्षांचे वाटप करून मातेला अखेरची श्रद्धांजली

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

बकोरी (ता. हवेली) येथील सामाजिक कार्यकर्ते, ‘वृक्षमित्र’ व माहिती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांच्या मातोश्री कै. कमल गोविंद वारघडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त आलेल्या नातेवाईक व ग्रामस्थांना लक्ष्मीतरु या बहुमोल वृक्षाच्या सुमारे एक हजार रोपांचे वाटप करून त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या उपक्रमासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते प्रभाकर जगताप यांनी पुढाकार घेतला. लक्ष्मीतरु हा बहुगुणी व औषधी गुणधर्म असलेला वृक्ष मानला जातो. विशेषतः आरोग्यदायी उपयोगांमुळे या रोपट्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातोश्रींना श्रद्धांजली वाहण्याचा हा आगळावेगळा प्रयत्न परिसरात कौतुकास्पद ठरत आहे.

या वेळी युवा प्रवचनकार प्राजक्ता झेंडे (करंदी) यांनी आपल्या प्रभावी प्रवचनातून आईच्या महत्त्वावर प्रकाश टाकत कै. कमल वारघडे यांनी आयुष्यभर केलेल्या दानधर्माचे विशेष स्मरण केले.

यावेळी आमदार बापू पठारे यांनी, “वृक्ष व पक्ष्यांप्रती असलेले प्रेम आणि समाजाभिमुख कार्य यामुळेच आज या विधीला ‘काक स्पर्श’ झाल्याचे पाहायला मिळाले,” असे मत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी अंधश्रद्धेला बळी न पडता सामाजिक कार्यातून आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तम भोंडवे यांनी वारघडे कुटुंबाने जुन्या अंधश्रद्धांना फाटा देत आधुनिक व समाजोपयोगी परंपरा जपल्याबद्दल विशेष कौतुक केले.

या प्रसंगी राज्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर तसेच पर्यावरणप्रेमी आणि माहिती सेवा समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930