नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , आगळे कुटुंब्याच्या ‘बानू’ या घोडीचा आजारपणामुळे मृत्यू, पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी – Lonikand Times

Lonikand Times

Latest Online Breaking News

आगळे कुटुंब्याच्या ‘बानू’ या घोडीचा आजारपणामुळे मृत्यू, पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणीकंद (ता. हवेली) : येथील आगळे कुटुंबातील ‘बानू’ या घोडीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आगळे फार्म ची मालक संतोष आगळे यांचे सुपुत्र श्रवण संतोष आगळे यांची ही ७ वर्षांची घोडी बैलगाडा स्पर्धांमध्ये सक्रिय होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बानू हिला काही दिवसांपासून आजारपणाचा त्रास होत होता. उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आले होते; मात्र विषबाधेमुळे प्रकृती खालावून अखेर दि. ४ एप्रिल २०२६ रोजी तिचा मृत्यू झाला. “ही आमची लाडकी होती,” अशी भावनिक प्रतिक्रिया आगळे कुटुंबीयांनी व्यक्त केली.

घोडीच्या निधनाची वार्ता समजताच परिसरातील शेकडो बैलगाडा प्रेमींनी लोणीकंद येथे गर्दी केली. अनेकांनी बानूसोबतचे आपले भावनिक नाते व्यक्त करत तिच्या आठवणींना उजाळा दिला. “ही फक्त जनावर नव्हती, तर आमच्या कुटुंबाचा एक भाग होती,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या.

बानूचा अंत्यविधी पारंपरिक पद्धतीने करण्यात आला. जेसीबीच्या साह्याने सुमारे १५ फूट खोल खड्डा खणून त्यामध्ये दोन पोती मीठ व हळद टाकून अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी वातावरण अत्यंत भावूक झाले होते, माणूस आणि प्राणी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930